Development is an Art

20 Aug 2007

कस्तुरीम्रुग

रोज रात्रीचा अंधार
त्या शांत आणि भयावह कोशामधून
मी रोज बाहेर येण्याचा प्रयत्न करतो
पण तेंव्हा रक्तिम उगवतीचं रूपही
विषण्ण वाटत असतं
त्या दिशेकडून येणारे पक्षीही
ज्वालामुखीच्या भितीने घाबरतात
उडतात आपले प्राण पणाला लावून
त्यांचे चित्कार भंडावून सोडतात रानाला
तो वातावरणाचा थंडपणा
रूतत जातो सर्वांगात
बधीर करतो प्रत्येक संवेदना
मग कुठूनतरी एक हुंकार ऐकु येतो
एका दशग्रंथी खर्जामधला
आणि पिसावलेलं माझं मन
शोधत राहातं
त्या हुंकाराचं मूर्त रूप
एखाद्या कस्तुरी मृगासारखं

2 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)