Development is an Art

13 Aug 2007

पहारा

नाहि हल्ली मी कुठेच जात नाही
रोज दिसतात नविन वाटा
खुणावतात त्या मला
सुंदर सुंदर बागा रोज बोलावतात मला
मी नाही म्हटलं की हसतात
आपसात खिदळतात..
निघुन जातात
खरंतर.. एकदा गेलो होतो अशा वाटेनं
झालो होतो बेहोश
त्या वाटेच्या अनुभवाने
झालो होतो रोमांचीत
उपभोगले सारे सुखदु:खांचे क्षण
त्यातल्याच दोन क्षणांचा
आज माझ्यावर पहारा आहे
म्हणूनच मी हल्ली कुठेच जात नाही